
मेंगलोर एक्सप्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने लांबविला
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. मेंगलोर एक्सप्रेसमधून प्रवास करणारे राजकिरण जाधव (रा. वरवडे) यांचा व्हिओ कंपनीचा २८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी ते झोपले असता लांबविला. हा प्रकार राजापूर ते चिपळूणच्या दरम्याने घडला. याबाबत जाधव यांनी रत्नागिरी स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
www.konkantoday.com