
मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा चिपळूणला आर्थिक फटका
चिपळूण ः गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात पाणी भरण्याचे व पडझडीचे अनेक प्रकार घडले असून अचानक येणार्या या अतिवृष्टीमुळे अनेक व्यावसायिकांना आपल्या दुकानातील माल हलवता न आल्याने पावसाच्या पाण्यात भिजून मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत एकूण १५२ नुकसानग्रस्त लोकांचे पंचनामे झाले आहेत. सध्याच्या पंचनाम्याप्रमाणे अंदाजे ९७ लाखांच्यावर नुकसान झाले असून याशिवाय सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची आकडेवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील चिपळूण शहराला जास्त बसला आहे.
www.konkantoday.com