मंडगडमध्ये पावसाचा बळी
रत्नागिरी ः गेले चार दिवस मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील चिंचघर पिंपळगांव, लाटवण आदी भागातील नदीकिनारी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून नैसर्गिक विधीसाठी ओढ्यावर गेलेल्या रघुनाथ कदम यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. सदरचे इसम लाटवण येथे रहात होते. कदम हे वाहून गेल्याची खबर मिळाल्यानंतर आपत्ती विभाग व पोलिसांनी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा शोध घेतला असता पिंपळगाव येथील नदीपात्रात त्यांचा मृतदेह मिळाला.
www.konkantoday.com