
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याच्या अवस्थेवरून माजी आमदार प्रमोद जठार संतप्त
चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था दयनीय होत आहे .याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर हे रस्ते दुरुस्तीबाबत आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जर संबंधित अधिकाऱ्यांनी हे रस्ते वाहतूक योग्य केले नाही तर त्यांना चोप द्यावा लागेल असे असे वक्तव्य भाजपा नेते व माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले एकुणच सिंधुदुर्गातील रस्त्याचा प्रश्न आंदोलने व अन्य मार्गाने गेले काही दिवस गाजत आहे.
www.konkantoday.com