कुडाळ शहरात बिबट्या हत्या

कुडाळ शहरातील दत्तनगर नजीकच्या स्वामी समर्थनगर परिसरात मादी जातीच्या व दोन ते तीन वर्षे वयाच्या बिबट्याची बंदुकीने गोळी घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी निदर्शनास आली. स्वामी समर्थनगर वस्तीपासून काहीशा अंतरावरच कच्च्या रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला. व्हिसेरा पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. काडतुसाच्या बंदुकीने बिबट्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आहे. वन विभागाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बिबटय़ाची हत्या का करण्यात आली असावी?, याबाबत शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मृत बिबट्या दोन ते तीन वर्षांचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
शहरातील दत्तनगर परिसरानजीक स्वामी समर्थनगर आहे. त्या परिसरात काहीसा जंगलमय भाग आहे. तेथे नजीक स्वामी समर्थनगर तसेच तानावडेवाडी परिसरात लोकवस्ती आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button