उत्तर प्रदेश येथील तरूणाचा मृतदेह वेरळ येथे आढळला

खेड ः वेरळ येथे एका वर्कशॉपच्या पाठिमागील खोलीत उत्तर प्रदेश येथील तरूणाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
निलेश प्रभाकर काणेकर (रा. खेड) यांनी खेड पोलीस स्थानकात याबाबतची खबर दिली. सत्यदेव रामपती यादव (३८, रा. शिखरघर, गोरखपूर उत्तरप्रदेश) हा काणेकर यांच्या खेड तालुक्यातील वेरळ येथील वर्कशॉपमागील खोलीत रहात होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button