जेसीबी खाडीपात्रात रुतला
कोळंब पुलाच्या दुरुस्तीवेळी खाडी पात्रात टाकण्यात आलेली माती (भराव) काढण्यासाठी खाडीपात्रात उतरलेला जेसीबी तेथेच रुतला.ही घटना शनिवारी घडली.जेसीबी चालकाने प्रसंगावधान दाखवून तो खाली उतरला.दिवसभर शर्तीचे प्रयत्न करून देखील जेसीबी काढण्यात यश आले नव्हते.या मातीमुळे किनारपट्टीवरील भागातील घरांमध्ये पाणी घुसण्याची भीती होती.त्यामुळे बांधकाम विभागाने ठेकेदारांना माती हटवण्याचे आदेश दिले. नेहमी प्रमाणे जेसीबी चालकाने जेसीबी भरावात उतरवला.ओहटी असल्याने काही तास त्याने कामदेखील केले.परंतु नंतर जेसीबी एका बाजूने खाली बसला.
www.konkantoday.com