सवलतीचा फायदा मिळवण्यासाठी शाळांच्या अंतरात गोलमाल करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार ?
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यातील सवलतीचा फायदा उठवण्यासाठी शाळांच्या अंतरात गोलमाल केल्याचा प्रकार पुढे आला आहे.या प्रकरणी सहा शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.त्या सहा शिक्षकांना म्हणणे मांडण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे तसेच जी.प ने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे .त्यासाठी शिक्षकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मार्च महिन्यात झाली.बदल्यांमध्ये योग्य शाळा न मिळालेल्यांनी आवाज उठवला.त्यांच्यासाठी संवर्ग ५ व ६ मधील बदल्या रद्द करून शासनाने समुपदेशनही घेतले.मात्र शिक्षकांनी बदल्यांमधील पती पत्नी एकत्रीकरणानंतर संवर्ग २ मधील सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुरुपयोग केल्याचे तक्रार पुढे आली होती.
www.konkantoday.com