महाड शहरात पूर
महाड :- गेल्या चोवीस तासात महाड, पोलादपूरमध्ये मुसळधार पाउस झाला आहे. या पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, शहरात भल्या पहाटे पुराचे पाणी शिरले. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुख्य बाजारपेठेमध्ये तसेच दस्तुरी नाका परिसर जलमय झाला असून, वाहतूक दुसर्या मार्गाने वळविण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com