
काजू उद्योजकांना शासनाकडून दिलासा
रत्नागिरी-कोकणातील काजू उद्योग उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शासनाकडून आकारण्यात येणार्या जीएसटीमुळे हा उद्योग अडचणीत आला होता. राज्याचे अर्थमंत्री सुनिल मुनगुंटीवार यांची महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी अर्थ व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, कृषी व उद्योग खात्याचे सचिव व भाजप प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर हे उपस्थित होते. काजू उत्पादकांच्या समस्या जाणून घेवून जीएसटीचा एसजीएसटी १०० परतावा जीएसटी लागू झाल्यापासून तसेच काजू उद्योजकांनी बँकांमधून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर ५ टक्के सबसीडी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच अर्थसंकल्पाच्यावेळी या उद्योगासाठी जाहीर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी काही निधी काजू लागवडीला देण्याचा निर्णयही घेण्यात आला. अर्थमंत्र्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे काजू उद्योजक व काजूबी शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com