आंबेनळी दुर्घटनेतील १८ मृतांच्या नातेवाईकांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः कुलगुरू डॉ. संजय सावंत
रत्नागिरी ः वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटातील अपघातात डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठातील ३० कर्मचार्यांचा मृत्यू झाला होता. यातील १८ कर्मचार्यांच्या नातेवाईकांना विद्यापीठामध्ये नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. एकाचवेळी इतक्या व्यक्तींना नोकरीवर घेण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. शासन याबाबत सकारात्मक आहे. उर्वरित मृत कर्मचार्यांपैकी काहींच्या नातेवाईकांचे वय १८ वर्षापेक्षा कमी तर काही ४५ वर्षापेक्षा अधिक असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com