
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक
येथील युवा सेनेचा उपशहर युवा अधिकारी गंधार साळवी या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्नाला नकार देणाऱ्या या युवकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंधार साळवी हा तरूण मांडवी येथे रहातो. त्याची फिर्यादी युवतीसोबत गेली तीन वर्ष ओळख होती. याच ओळखीतून या युवतीला साळवी याने फ्लॅटमध्ये नेऊन २० जुलै २०१७ रोजी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर ७ जुलै २०१९ रोजी पुन्हा त्याने तिच्याशी संबंध ठेवले. त्यानंतर या अल्पवयीन युवतीने लग्नाबाबत विचारणा केली असता, गंधार याने तिला लग्नास नकार दिला. त्यानंतरही अल्पवयीन असल्याने या युवतीला तुज्याशी लग्न करायचे नाही म्हणून त्यांने सांगितले होते.
त्यामुळे या युवतीने अखेरीस स्थानकात तक्रार केली पोलीस साळवी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंधार साळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर त्याला तातडीने अटकही केली. शनिवार गंधार याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपिका मुसळे अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com