
एसटी विभागाची बचत एसटीच्या काचेवर चक्क खडूने फेर्यांचे मार्ग लिहिण्याचा नवा फंडा
प्रवाशांना कोड्यात टाकणारा नवा फंडा चिपळूण आगारातील चालकांनी काढला आहे. एसटी बस मार्गाचा सुस्पष्ट फलक लावण्याचे आदेश शासनाकडून असतानाही येथील काही चालक खडूच्या सहाय्याने चक्क बसच्या काचेवर फेर्यांचे मार्ग लिहित आहेत. त्यामुळे प्रवाशांची फसगत होत असून आपल्या मार्गावरची बस शोधताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले चिपळूण आगार हे कायम प्रवाशांनी फुल्ल असते. सण, उत्सव काळात तर हे आगार प्रवाशांनी फुलून जाते. सद्यस्थितीत शिमगोत्सवाला आलेले चाकरमानी परतू लागले आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणार्या बसेस भरून येत असल्याचे चित्र आहे. असे असताना ऐन प्रवासी हंगामात बसेसवर मार्गफलक न लावता बसेसच्या काचेवर खडूने त्या मार्गाचे नाव लिहून त्या मार्गावर बस ने-आण केली जाते. www.konkantoday.com