रत्नागिरीत पकडलेल्या कोकेनचा मुख्य सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश ,हवाई दलाचा कर्मचारी अटकेत
रत्नागिरी :- रत्नागिरी एमआयडीसी पोलिसांनी पकडलेल्या ५० लाख रुपये किमतिच्या कोकेन प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोकेनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पैकी एक क्षण भारतीय हवाई दलातील असल्याचे कळते. पंजाब येथील मुकेश शेरान याच्यासह सहकारी अंकित सरबिर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. मुकेश शेरान हा भारतीय हवाई दलातील कर्मचारी असून या दोघांच्या माध्यमातूनच दिनेश शुभे सिंग याच्याकडे कोकेन दिले गेल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिनेश शुभे सिंग याच्यासह तिघांना यापूर्वीच रत्नागिरीतील एमआयडीसीत पकडण्यात आले आहे.कोकेन घेऊन आलेल्या दिनेश सिंग, रामचंद्र मलिक या दोघांची चौकशी केल्यानंतर भारतीय हवाई दलातील एका कर्मचार्याची रामचंद्र मलिक सोबत कोकेनची डील झाल्याची माहिती पुढे आली. रत्नागिरीत कोकेनची विक्री करण्यासाठी दिनेश सिंग याच्याकडे ५० लाख रू.चे कोकेन पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सुत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके राजस्थान, पंजाब येथे गेली होती.
कोकेनचा मास्टर माईंड मुकेश शेरान (रा. पंजाब) हा हवाई दलाच्या पंजाब येथील तळावर सेवेत असून त्याने राजस्थान येथील अंकित सिंग याच्यामार्फत दिनेशकडे कोकेन दिले होते. त्याचप्रमाणे रामचंद्र व मुकेश यांच्याशी त्याचे फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यामुळे पोलिसांनी मुकेश शेरान याला पंजाब येथून तर अंकित सिंग याला राजस्थान येथून ताब्यात घेतले.
हवाई दलात सेवेत असलेल्या मुकेश याच्या अटकेची परवानगी पोलिसांनी स्थानिक न्यायालयाकडून घेऊन, त्याला ताब्यात घेतले व तेथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीनंतर मुकेशला रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. तर अंकित सिंग याला घेऊन पोलीस पथक रत्नागिरीत दाखल झाले असून, त्याला शुक्रवारी खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
www.konkantoday.com