![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2019/07/SmartSelect_20190726-100718_Samsung-Internet.jpg)
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आगळ्या उपक्रमाने साजरा करणार ः म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी ः शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होणार्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व तरूणांसाठी यावर्षी आगळा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ग्रामीण भागातील मुले छोट्या शहरातून मोठ्या शहरात येताना त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागातल्या मुलांकडे हुशारी असली तरी व्यक्तीमत्व विकासात ते कमी पडतात व त्यांच्यात एक प्रकारे न्युनगंड निर्माण होतो. याशिवाय कमी गुण मिळविणारी मुलं व नापास होणारी मुलं तर पूर्णपणे खचून जातात. यासाठी या विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी या विषयाचे तज्ञ नेमाळकर यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना होणार आहे. पाली येथे सकाळी ९ वा. हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी १ हजार मुले उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर रत्नागिरी येथील पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास या विषयाचे तज्ञ विकास नेमाळकर मार्गदर्शन करणार असून त्यामध्ये त्यांच्या पुढील करिअरसाठी व परदेशात जाणार्या युवकांसाठी तसेच तांत्रिक शिक्षणामध्ये असलेल्या स्पर्धेमुळे होणार्या समस्यांमुळे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातील विद्यार्थ्यांच्यात व्यक्तीमत्वात बदल होवून ते मोठ्या शहरात देखील सहजगत्या वावरू शकणार आहेत. त्यानंतर दु. १२.३० वा. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सांस्कृतिक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे हे या कार्यशाळेला उपस्थित राहणार असून मला अभिनयात यायचय हा या कार्यशाळेचा विषय आहे. अभिनयाच्या या कार्यशाळेत सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २८ तारखेला ११ वा. म्हाडाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महालक्ष्मी सभागृहात गिरणी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
www.konkantoday.com