शिवशाही चषक कॅरम स्पर्धा मध्ये मुंबई संघाची बाजी

शिवशाही चषक ५५ वी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०१९-२० रत्नागिरी येथे विवेक हॉटेलच्या ग्राऊंडवर संपन्न झाली .काजल कुमारी (मुंबई )महिला एकेरी व मोहम्म्द घुफ्रान ( मुंबई ) पुरुष एकेरी अंतिम विजेते .महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित माजी क्रीडा मंत्री, शिवसेना उपनेते व म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिस्टल, इंडियन ऑइल, ओ एन जी सी, भारतीय आयुर्विमा महामंडळ व झियान सी फूड्स पुरस्कृत हॉटेल विवेक, रत्नागिरी येथे सुरु असलेल्या शिवशाही चषक ५५ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेचा २५-१०, २५-४ असा सपशेल धुव्वा उडवून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या संदीप देवरूखकरने ठाण्याच्या राजेश गोहिलवर १८-११, १९-१८ अशी मात करत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस काबीज केले. महिला गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने बाजी मारली तिने मुंबईच्या नीलम घोडकेवर चुरशीच्या लढतीत १२-२१, २५-७, २५-१५ असा निसटता विजय मिळविला व या गटाचे विजेतेपद मिळविले. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या ऐशा खोकावालाने रत्नागिरीच्या मैत्रेयी गोगटेवर २४-०, १५-१४ अशी मात केली. स्पर्धेतील विजेत्यांना माजी क्रीडा मंत्री, शिवसेना उपनेते, म्हाडा अध्यक्ष व स्थानिक आमदार उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्र व शिवशाही चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री महेश म्हाप, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, सहसचिव अजित सावंत, रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, इंडियन ऑईलच्या अंजली भावे, ओ एन जी सी चे अशोक गौर, विवेक हॉटेलचे मालक कमलाकर देसाई, रमाकांत देसाई,, नितीन लिमये, विवेक देसाई, राहुल बर्वे आदी मंडळी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button