बाळ माने यांच्याबरोबरची बैठक गुप्त नव्हे तर अधिकृतच ः आ. उदय सामंत
रत्नागिरी ः भाजपचे नेते व माजी आमदार बाळ माने यांच्याबरोबर आपली बैठक ही गुप्त बैठक नसून अधिकृत बैठक असल्याचे म्हाडचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी सांगितले. आपल्या रत्नागिरी दौर्यात आपण माने यांच्याबरोबर बैठक होण्याचे जाहीर केले होते. रत्नागिरी विश्रामगृहावर होणार्या या बैठकीत आगामी काळात शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांच्यात एकमेकांच्या सहकार्याबद्दल चर्चा केली जाणार आहे. याशिवाय आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर शिवसेना व भाजप युती कायम असून त्याबाबतही चर्चा बैठकीत होत आहे. या बैठकीनंतर माने हे आपल्या पक्षाची कोणती भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com