निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बदल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश गवस यांना अचानक बदलण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती प्रदेश सरचिटणीसपदी करण्यात आली आहे. मात्र या बदलामुळे गवस गटात नाराजी निर्माण झाली असून पक्षामध्ये निष्ठावंतांना किंमत नसल्याने आपण पक्षाचा त्याग करणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे. यामागे माजी आमदार भोसले गटाचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
www.konkantoday.com