
बँकेच्या खात्यातून ऑनलाइनद्वारे १६हजार रुपये लांबविले
बँकांच्या खात्यातून ऑनलाईन ट्रांजेक्शन द्वारे पैसे लांबवण्याचे प्रकार याआधी घडले असतानाच चिपळूण येथील राहणारे चंद्रकांत चाकुंदे यांच्या बचत खात्यातील १६ हजार रुपये अज्ञात इसमाने ऑनलाईन ट्रांजेक्शन द्वारे लांबविले.
यातील फिर्यादी चाकुंदे यांचे चिपळूण येथील एचडीएफसी बँकेत बचत खाते असून त्यामध्ये लाखो रुपये होते. मात्र अज्ञात इसमाने या खात्यातील सोळा हजार रुपये ऑनलाईन ट्रांजेक्शन द्वारे काढून घेतले आपल्या खात्यातील पैसे कोणीतरी काढून घेतल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
www.konkantoday.com