जिन्यावरून पडून चाकरमान्याचे निधन
जिन्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या चाकरमान्याचा उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे निधन झाले.ही घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अवधूत वालावलकर (वय ४३ रा, मालाड मुंबई) असे त्याचे नाव आहे.माठेवाडा ( सावंतवाडी)येथील आपले चुलत भाऊ यांच्या घरी ते आले होते. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्यात ते कुटुंबासोबत गप्पा मारत बसले होते. मात्र अचानक तोल गेल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते.
www.konkantoday.com