चिपळूण परिसरात आणखी एक गुटख्याचा कारखाना सापडला

चिपळूण शहरात व शहर परिसरात या आधी सावर्डे ,कालुस्ते येथे गुटखा बनवणारे कारखाने सापडले होते .त्यावर पोलिसांनी कारवाई केली असतानाच आता चिपळूण जवळील कामते माळेवाडीत एका बंद बंगल्यात पोलिसांना गुटख्याचा कारखाना आढळून आला. पोलिसांनी या बंगल्यावर धाड घालून सुमारे तीनशे किलो वजनाचा लाखो रुपये किमतीचा गुटखा व मशिनरी आढळून आली.या प्रकरणी पोलिसांनी मोसीन मेमन ,पेठमाप चिपळूण या युवकाला ताब्यात घेतले आहे. डीवायएसपी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी ही धाड घातली चिपळूण शहरातील अनेक पानपट्ट्यांवर गेल्या काही दिवसांत अशाप्रकारे गुटखा उपलब्ध होत होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button