
ग्रामसेवकाला धक्काबुक्की एकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिनेश शिवगण यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून सुलतान मुकादम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुकादम यांनी पेयजल योजनेतून प्रस्ताव दाखल केला होता. परंतु हा प्रस्ताव अनेक दिवस ग्रामसेवकांकडे पडून होता त्याची चौकशी करण्याकरता मुकादम कार्यालयात आले असता ग्रामसेवकांनी त्यांचे कडे आणखी कागदपत्रे मागितली त्यातून राग येऊन मुकादम यांनी शिवगण यांना धक्काबुक्की केली अशी फिर्यात शिवगण यांनी पोलीस स्थानकात दिली.
www.konkantoday.com