
गुहागरमधून भाजपातर्फे डॉक्टर विनय नातू यांचे नाव निश्चित ?
गुहागर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर विनय नातू यांचे नाव भाजपाच्यावतीने निश्चित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. याबाबत नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली .त्यामध्ये नातू यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र लवकरच भारतीय जनता पक्षाच्यावतीने नातू यांचे नाव जाहीर होईल असा अंदाज आहे.
www.konkantoday.com