राष्ट्रवादीचे माजी मंत्री सचिन आहिर शिवबंधनात अडकले
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सचिन आहिर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.सचिन आहिर हे मुंबई मतदारसंघात आमदार राहिलेले आहेत.तसेच आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते मंत्री देखील राहिलेले आहेत.सचिन आहिर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.आपण राष्ट्रवादी पक्ष फोडणार नसून, शिवसेना पक्ष मोठा करणार अाहे असे सांगितले .
www.konkantoday.com