
मुंबई-गोवा महामार्गावरील खरवते गावातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यास नॅशनल ऍथोरीटीला यश
राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये खरवते चार्याचा पर्या येथे १० ते १५ मीटर उंचीचा भराव टाकण्यात आल्यामुळे या ठिकाणी पाणी साठून धरणसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरवते, कोदवली भागातील काही घरांना धोका निर्माण झाला होता. यानंतर आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळी येवून महामार्ग विभाग व कामाचा ठेका घेतलेल्या अधिकार्यांना याचा जाब विचारून हे पाणी तातडीने उपसावे अशी मागणी केली होती. शेवटी महामार्ग विभागाने मशिनरी लावून या पाण्याचा निचरा करण्यास यश मिळवले. त्यामुळे आता या भागाचा धोका कमी झाला आहे.
www.konkantoday.com