बुलेट चोर टोळक्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सात दुचाकी चोरल्याची कबुली
रत्नागिरी -मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेले व सध्या विरार येथे राहणारे जयप्रकाश चिंदरकर व विशाल नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन बुलेट चोरून मुंबई येथे नेत असता राजापूर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी मध्यरात्री अटक केली होती .पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आरोपींकडे कोणतीही गाडय़ांचे कागदपत्रे मिळाली नव्हती शेवटी आरोपीने आपण या दोन बुलेट मुंबई येथे चोरून नेत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींची अधिक चौकशी केली असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चार व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून दोन व देवरूखातून एक अशा अॅक्टिव्हा चोरल्याची कबुली दिली आहे.
www.konkantoday.com