चिपळूण शहरात उभा राहणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
चिपळूण ः चिपळूण शहरात आता शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आला असून या पुतळ्याच्या कामाचे लवकरच टेंडर निघणार आहे. याशिवाय गेले काही महिने नुतनीकरणाचे काम चालू असलेल्या सांस्कृतिक केंद्रही लवकरच चिपळुणकरांना उपलब्ध होणार असून या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय चिपळूण शहरातील शिवाजी चौक ते पॉवर हाऊस आणि शिवाजी चौक ते बहाद्दूरशेख नाका या दोन्ही रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र हायस्कूल ते पेठमाप, एस.टी. स्टँड ते बायपास या ठिकाणी चिपळूण पालिका पुल उभारणार आहे.
www.konkantoday.com