कोकण रेल्वे पोलिसांना ठेंगा दाखवत मोबाईल चोरीचे प्रकार सुरूच
रत्नागिरी ः गेल्या काही दिवसात रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या दरम्याने कोकण रेल्वेच्या विविध गाड्यात मोबाईल चोरीचे प्रकार घडले असून मोबाईल चोरी करणारी टोळी या भागात वावरत असावी असा संशय आहे. गेल्या आठ दिवसात रेल्वेतून प्रवास करणार्या दोन प्रवाशांनी मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी रत्नागिरी पोलीस स्थानकात केल्या होत्या. तरी देखील दिवसेंदिवस मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होत असून रेल्वेने प्रवास करणारे प्रमोदकुमार बैरवा यांचा ९ हजार रुपये किंमतीचा मोबाईलही रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या दरम्याने चोरट्यांनी लांबविला आहे.
www.konkantoday.com