
एसटीचे आरक्षण आता ६० दिवस आधी मिळणार
मुंबई- गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानांचे व येतानांचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष, श्री. दिवाकर रावते यांनी दिली. याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना देखील होणार आहे.
एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा बसेसची सोय केली आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाता-येता चे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे.
www.konkantoday.com