प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्हा सर्वात कमी काम असलेला जिल्हा

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्हा देशपातळीवर व महाराष्ट्रातील सर्वात कमी काम असलेला जिल्हा म्हणून नोंद झाली आहे.मातृवंदना योजनेचे सर्वात कमी काम रत्नागिरी जिल्ह्यात झाले आहे,त्यामुळे लोकांना या योजनेचा फायदा झाला नसल्याचे समजते.रत्नागिरी जिल्ह्याने एकूण उद्दिष्टाच्या केवळ ५९ % उद्दिष्ट पूर्ण केले आहे.प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत सरकार गर्भवती महिलांना आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते.प्रधानमंत्री मातृवंदना योजना व राष्ट्रीय स्वास्थ मिशन या योजनेमध्ये सरकार पहिल्यांदाच गर्भवती राहणाऱ्या ग्रामीण महिलेच्या खात्यांमध्ये एकूण ६४०० रु व शहरी महिलेच्या खात्यामध्ये ६००० रु जमा करणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button