खेड परिसरात दोन एसटी एकमेकांवर आदळल्याने 29 प्रवासी जखमी
खेड- साखर- खेड व खेड-चाेरवणे या दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर झाल्याने झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यातील एकूण २९ प्रवासी जखमी झाले असून त्यातील नऊ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे .हा अपघात खेड तालुक्यातील धामणंद गावानजीक घडला.दोन्हीही एसटी वेगात असल्याने ही टक्कर झाली जखमींमध्ये पंधरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींना एसटीकडून प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत देण्यात आली आहे.
www.konkantoday.com