अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची अश्लील फिल्म बनवणाऱ्या वसीम खलपे याला न्यायालयीन कोठडी
दापोली-दापोली मंडणगड तालुक्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख काढून तिच्यावर सहकाऱ्यांसह अत्याचार करून तिची अश्लील फिल्म बनविणाऱ्या वसीम खलपेयाला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यातील संशयित आरोपी वसीम खलप व त्याचा मित्र मासूम याने महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओळख काढली त्यानंतर जानेवारी १७पासून ऑगस्ट १८ या कालावधीत तिला वेगवेगळय़ा लॉजिंग व ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच तिची अश्लिल फिल्म बनवून तिला सतत ब्लॅकमेल केले. यातील तिसरा आरोपीने मोबाइल फोनवरून सदर तरुणीशी अश्लील बोलणे करून धमकी दिली होती. त्यानंतर सदर तरुणीने पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी संशयित वसीम याला ताब्यात घेतले होते व पोलीस कोठडीत ठेवले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. यातील दोन आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. यातील एक आरोपी परदेशात आहे .या कृत्यांसाठी संशयित आरोपींनी वापरलेली वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
www.konkantoday.com