साटवली पुल खचल्याने मोठा धोका, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

लांजा ः लांजा तालुक्यातील साटवली येथील रत्नागिरी आणि लांजा या गावांना जोडणारा साटवली हायस्कूलनजिकचा पुल दोन दिवस पडणार्‍या अतीवृष्टीमुळे खचला असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. १९८३ साली बांधण्यात आलेल्या या पुलाची अवस्था जीर्ण आहे. या मार्गावरून रत्नागिरी, लांजाला जाणारे पर्यायी मार्ग म्हणून या पुलावरून जात असतात. तसेच पावस, खानवली, हर्चे, बेणी, सापुचे तळे आदी ठिकाणी जाण्यासाठी या पुलावरून वर्दळ सुरू असते. तसेच या पुलावरून शाळा-कॉलेजला जाणारे अनेक विद्यार्थी प्रवास करीत असल्याने हा पुल खचल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय अनेक गावांचाही संपर्क तुटू शकणार आहे. स्थानिक पुढार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच ही पुलाची अवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button