
तिवरे आपद्ग्रस्तांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले १५ कंटेनर आणण्याचा प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी ः तिवरे धरण फुटीनंतर तेथे असलेल्या आपद्ग्रस्तांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी प्रशासनाने शेड बांधण्यासाठी निवडलेल्या जागेला भेगा पडल्याने प्रशासनासमोर निवारा शेड उभारण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यातून आता प्रशासनाने मार्ग काढला असून अत्याधुनिक सुविधा असलेले कंटेनर आपद्ग्रस्तांसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा कंटेनर ३०० स्क्वे. फुटाचा असून त्यामध्ये दोन रूम, किचन, बाथरूम आदी सुविधा असून एकूण १५ कंटेनर आणण्यात येणार असून त्यासाठी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. हे कंटेनर ठेवण्याच्या जागेची संबंधित कंपनीच्या अधिकार्यांनी नुकतीच पाहणी केली.
www.konkantoday.com