कोकण रेल्वेमध्ये मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट, अनेक घटना घडूनही चोरटे मात्र मोकाट
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या जाणार्या गाड्यांमधून मोबाईल चोरीला जाण्याचे अनेक प्रकार घडले असून नुकतेच मोबाईल चोरीचे दोन प्रकार घडल्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसला आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या चंद्रिका व्यंकटेश (रा. उडपी) या प्रवास करीत असताना रत्नागिरी स्टेशन स्थानकाच्या दरम्याने त्यांचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लांबविला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत चोरटा फरारी झाला होता. त्यामुळे चंद्रिका यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच मुंबई चेंबुर येथे राहणार्या प्रगती शेट्टी या कोकण रेल्वेने प्रवास करीत असताना रत्नागिरी स्टेशनच्या दरम्याने मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांचा १८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनीही रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यात मोबाईल चोरीचे अनेक प्रकार रत्नागिरी स्थानकाच्या दरम्याने घडत असून मोबाईल चोरांना पकडण्यात रेल्वे पोलीस यशस्वी झाले नसल्याने सध्या हे मोबाईल चोर मोकाट फिरत आहेत.
www.konkantoday.com