आम्ही शहराला शुद्ध पाणी देत असल्याची न.प.चे पाणी सभापती सुहेल मुकादम यांचा दावा
रत्नागिरी ः रत्नागिरी नगरपरिषद प्रयोगशाळेतून तपासून निर्जंतुकीकरण केलेलेच शुद्ध पाणी रत्नागिरीकरांना पुवत असल्याचा दावा रत्नागिरी नगरपरिषदेचे पाणी सभापती सुहेल मुकादम यांनी केला आहे. विरोधकांकडून शहराला अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप हा चुकीचा असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात असल्याची टीका मुकादम यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी ६ पक्षांची शहर विकास आघाडी स्थापन झाली असून त्याच्यावतीने माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा यांनी शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र नादुरूस्त असल्याचा दावा करून शहरवासियांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असून आपण त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासायला पाठविणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पाणी सभापती सुहेल मुकादम यांनी खुलासा केला असून विरोधक आगामी पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाहक आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com