शेतातील पाटाचे पाणी वळविल्याच्या रागातून तरूणाला मारहाण
रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील गणेशगुळे येथे तोडणकरवाडी येथे राहणारा जितेंद्र तोडणकर या तरूणाला पाटाच्या पाण्याच्या वादावरून मारहाण झाली आहे. यातील सचिन तोडणकर याने मारहाण केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. यातील जितेंद्र हे आपल्या शेतात लावणीसाठी गेले असता त्यांनी पाटाचे पाणी आपल्या शेतात वळविले होते. याचा राग येवून बाचाबाची होवून सचिन याने जितेंद्रला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
www.konkantoday.com