शिरगांव चंपक मैदान परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय, ग्रामपंचायतीच्यावतीने चौकशीची मागणी
रत्नागिरी ः शिरगांव येथे जाणार्या चंपक मैदानजवळील रस्त्यावर गेल्या दोन तीन दिवसात चोरट्यांची टोळी कार्यरत झाली असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. दोन दिवसांपूर्वी कामावरून घरी जाणार्या एका दुचाकीस्वाराला एका महिलेने थांबविले. तिच्याकडे लहान मुल होते. ते रडत असल्याने लिफ्ट देण्याची मागणी त्या महिलेने केली. ती दुचाकीस्वाराच्या मागे बसली असता पुढे गेल्यावर दुचाकीस्वाराच्या गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध असलेल्या दुचाकीस्वाराने हा प्र्रयत्न हाणून पाडला व त्या महिलेला तेथेच उतरवले.
या महिलेचे साथीदारही आजुबाजूला फिरत असल्याचा ग्रामस्थांचा संशय आले. लाल रंगाची ऍक्टीव्हा गाडीवर अपरिचित माणसे फिरत असल्याचे ग्र्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे या सर्व प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी शिरगांव ग्रामपंचायतीच्यावतीने पोलिसांना एक निवेदन देवून करण्यात आले.
www.konkantoday.com