
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक सप्टेंबरमध्ये ?
रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.ही निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सप्टेंबरमध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात रत्नागिरीकरांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परत एकदा मतदान करावे लागणार आहे .त्यामुळे विधानसभा निवडणुकपूर्वी नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लागणार हे जवजवळ निश्चित झाले आहे.
www.konkantoday.com