रत्नागिरी नगर परिषदेचे सत्ताधिकारी नागरिकांना देत आहेत दुषित पाणी ः माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा आरोप
रत्नागिरी ः रत्नागिरी नगर परिषदेमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या सत्ताधार्यांकडून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून गेले काही दिवस रत्नागिरी शहरातील नागरिकांना दुषित व गढूळ पाणी पुरविले जात आहे. पाणी शुद्धीकरणासाठी असलेली यंत्रणा बंद पडली असून त्यामुळे नागरिकांना दुषित पाणी पुरविले जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा यांनी केला आहे. या प्रश्नी आपण आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या मुलभूत प्रश्नाकडे सध्याच्या सत्ताधिकार्यांचे कोणतेही लक्ष नाही त्यामुळे पावसाळ्याआधी गटारातील कचरा उपसण्याचे काम नगर परिषदेने केले नाही. त्यामुळे शहरातील विविध भागात की ज्या ठिकाणी पाणी साचण्याचा कोणताही संभव नाही. अशा ठिकाणी देखील पाणी साचले गेले. या सर्वाला नगरपरिषदेमधील सत्ताधारी जबाबदार असल्याचे कीर यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com