रत्नागिरी नगर परिषदेची रहदारीच्या ठिकाणी अतिक्रमणाविरूद्ध मोहीम
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील बस स्थानकापासून राम मंदिरापर्यंत असलेल्या रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या आजुबाजूला भाजीवाले, फळविक्रेते यांनी अतिक्रमण केले असून त्या विरोधात रत्नागिरी नगर परिषदेने मोहीम सुरू केली आहे. नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाने एस.टी. स्टँड परिरातील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा माल जप्त केला. या कारवाईत जप्त केलेली १०० किलो भाजी नगर परिषदेने बाल सुधारगृहाला दिली. या मोहिमेमुळे व्यापार्यांच्यात घबराट निर्माण झाली असून नागरिकांनी मात्र मोहिमेचे स्वागत केेले आहे. अतिक्रमाणविरोधी ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.
www.konkantoday.com