फिनेल प्याल्याने तरूण रूग्णालयात दाखल
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात मांडवी भागात राहणारा यश पाटील या तरूणाने फिनेल प्राशन केल्याची घटना घडली. घरात असलेले फिनेल त्याने प्राशन केले. त्याला अस्वस्थ वाटू लागले. ही गोष्ट त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.