
जिल्हा परिषदेचे रस्ते झाले खड्डेमय, एस.टी. विभागाने ११२ मार्गावर केली वाहतूक बंद
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिरषदेच्या रस्त्यांची दैना उडाली असून हे रस्ते खड्डेमय झाल्याने या ठिकाणी एस.टी. वाहतूक करणे अशक्य मनल्याने व काही रस्ते धोकादायक झाल्याने एस.टी. महामंडळाने जिल्ह्यातील ११२ मार्गावरील फेर्या रद्द केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे हे रस्ते खराब झाल्याच्या तक्रारी संबंधित खात्याकडे केल्या होत्या. हे रस्ते सुधारावेत अन्यथा वाहतूक बंद करावी लागेल असेही एस.टी. विभागाने कळविले होते परंतु त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे शक्य नसल्याच्या तक्रारी एस.टी. चालकांनी केल्यामुळे या मार्गावरील फेर्या बंद करण्याचा निर्णय एस.टी. विभागाने घेतला आहे. रत्नागिरी तालुक्यात २४, लांजा १३, राजापूर ८, मंडणगड ८, खेड तालुका ११, चिपळूण १२, गुहागर ६, देवरूख १६ रस्ते खराब झाले आहेत.
www.konkantoday.com