कर्नाटक पेच सुटला; कुमारस्वामींचं सरकार कोसळलं
बेंगळुरू: गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार अखेर पडलं. अवघ्या चार मतांनी कुमारस्वामींना बहुमत गमवावं लागलं आहे. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
www.konkantoday.com