
जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश असूनही काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांकडून शिक्षकांना शाळेत हजर राहण्याची सक्ती
रत्नागिरी जिह्यात करोना चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे शासनाने शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत शाळांमध्ये शिक्षकांना बोलावण्यात येऊ नये असे लेखी आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत तरीदेखील जिल्ह्यात काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडून शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती केली जात आहे राजापूर तालुक्यातही काही शाळांतील मुख्याध्यापकांकडून शाळेतील शिक्षकांना शाळेत बोलावण्यात येत आहेत याबाबत काल झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी कर्फ्यूच्या काळात शिक्षकांना शाळेत बोलवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे
कर्फ्यूच्या काळात कोणत्याही शिक्षकांना किंवा प्रध्यापकांना शाळेत/महाविद्यालयात बोलावू नये असं स्पष्ट करत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शाळेत/महाविद्यालयात शिक्षक/प्राध्यापक आले तर संबंधित मुख्याध्यापक आणि संस्थाचालक कारवाईस पात्र राहतील, असं सांगितलं आहे.
www.konkantoday.com