लॅपटॉपमधून धूर निघाल्याने दुरुस्ती करणाऱयाला मारहाण
दुरुस्तीला दिलेल्या लॅपटॉपमधून धूर निघाल्याने त्या बदली नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणी करून खेड येथील योग इलेक्ट्रॉनिक्सचे मालक उपेंद्र घोडे यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून सुलतान झारी व मुनाफ झारी या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला आहे
या झारी बंधूंनी उपेंद्र यांच्याकडे आपला लॅपटॉप दुरुस्तीसाठी टाकला होता परंतु या लॅपटॉप कंपनीचे स्पेअर मिळत नसल्याने त्याने हा लॅपटॉप घेऊन जाण्यास सांगितले होते परंतु तरी देखील झारी बंधूंनी लॅपटॉप दुरुस्तीचा आग्रह धरला तो दुरुस्त करीत असता त्यातून अचानक धूर येऊ लागला त्यामुळे चिडलेल्या झारी बंधूंनी दुकानदाराकडे नुकसानीपोटी पाच हजार रुपयांची मागणी करून त्याला मारहाण केली.
www.konkantoday.com