रत्नागिरी शहर परिसरात पावसाचा जोर वाढला ,अनेक भागात रस्त्यावर पाणी
रत्नागिरी शहर परिसरात सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहराच्या अनेक भागात पाणी रस्त्यावर आले आहे शहरातील विविध भागात थिबा पॅलेस मारुती मंदिर नाचणे रोड बाजारपेठ एमआयडीसी आदी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत याशिवाय केळे माजगाव मिरजोळे आदि देखील पावसाने जोर केल्याने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक खंडीत झाली आहे या पावसाने रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभाराचे पितळ उघड पडले फूटपाथखालील गटारे नगरपरिषदेने साफ केली नसल्याने मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहत असल्याचे दृश्य अनेक भागात दिसली कधी नव्हे त्या सकल भागात देखील रस्त्यावर पाणी साठल्याचे दिसून आले.
www.konkantoday.com