
रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्ष पोटनिवडणूक विधानसभेपूर्वी?
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आधी होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे.आजच रत्नागिरी शहर विकास विकास आघाडीच्यावतीने माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे ही निवडणूक लवकरच होणार हे स्पष्ट आहे.तसेच या निवडणुकीबाबत शासकीय पातळीवरूनही स्थानिक अधिकाऱयांना निवडणुकीच्या दृष्टीने सूचना आल्याचे कळते.शिवसेनेच्यावतीने सध्याचे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव निश्चित समजले जाते.
www.konkantoday.com