तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने आमदार संजय कदम व इतरांविरुद्ध अटकेची कारवाई
२००५ मध्ये खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नागरिकांचे झालेल्या नुकसान भरपाई मिळावी या करीता शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले होते. तसेच याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले संजय कदम व त्यांच्या समर्थकांनी हंगामा केला होता. यावेळी तत्कालीन जि.प. उपाध्यक्ष संजय कदम यांनी प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांच्याशी बाचाबाच झाली होती. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणावर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संजय कदम यांच्यासह ६ जणांवर दोषारोप सिद्ध झाल्याने १ महिन्याचा सश्रम कारावास व ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर कदम यांनी अपील दाखल केले होते. दरम्यान, दाखल करण्यात आलेल्या अपिलावर येथील न्यायालयात सुनावणी होवून अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत २ आठवड्यात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयात दाखल झालेल्या अपिलाच्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कायम ठेवलेली शिक्षा आणि त्यावर जामीन कसा काय देवू शकते असा तांत्रिक मुद्दा न्यायालयाने उपस्थित केल्याने आमदार संजय कदम यांच्यासह ६ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. www.konkantoday.com