कोकणला पडतोय मादक पदार्थांचा विळखा

रत्नागिरी ः दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात ५० लाख रुपयांचा कोकेनचा साठा जप्त करून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली असतानाच आता कुडाळ येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ६० हजार रुपयांचा गांजा जप्त केला. यामुळे कोकण हा मादक पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचे दिसून येत आहे. कोकणासारख्या ठिकाणी मादक पदार्थ पकडल्याचे प्रकार म्हणजे या ठिकाणी या मादक पदार्थांना मागणी असल्यामुळेच हे मादक पदार्थ येथे आणले जात असल्याने शांततामय कोकणात देखील अशा घटना घडल्यामुळे शिंतेचा विषय झाला आहे. कुडाळ येथील एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सईद शेख याच्याकडे गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत अंदाजे ६० हजार रुपये आहे. सदरचा इसम गांजा विकायला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button